31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटेक्नॉलॉजीशेतकरी आणि ऊसतोड मजुरांचे ओझे होणार कमी, अमोल कोल्हे यांची विशेष पोस्ट

शेतकरी आणि ऊसतोड मजुरांचे ओझे होणार कमी, अमोल कोल्हे यांची विशेष पोस्ट

टीम लय भारी

शिरूर : वेगवेगळ्या मुद्यांवर आपले मत व्यक्त करण्यासाठी डाॅ. अमोल कोल्हे सोशल मिडीयावर नेहमीच आग्रही दिसतात. यावेळी सुद्धा त्यांनी इस्लामपूरच्या आयआरटी महाविद्यालयातील मुलांचे अनोख्या योगदानाबद्दल कौतुक करून शेतकरी आणि ऊसतोड मजूरांचे ओझे कमी करण्यासाठी लावलेल्या अनोख्या शोधाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

डाॅ. अमोल कोल्हे ट्वीटर पोस्टमध्ये लिहितात, “आपल्या इस्लामपूरच्या आयआरटी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल शाखेच्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड व ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी शेतकरी बांधव व ऊसतोड मजुरांना एक अनोखी भेट दिली आहे. त्यांनी बैलगाडीसाठी बैलाच्या मानेवरील ओझे कमी करणारा रोलिंग सपोर्टर बनवला आहे”, असे म्हणून डाॅ. कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या अनोख्या प्रयोगाची माहिती दिली.

पुढे डाॅ. कोल्हे म्हणाले, “बेंदूर सणाच्या निमित्ताने या विद्यार्थी मित्रांनी शेतकऱ्याला साहाय्य करणाऱ्या बैलांबद्दल ही आगळीवेगळी कृतीशील कृतज्ञता व्यक्त केलीय. या अनोख्या शोधाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन! आगामी काळात अशीच संवेदनशील जपत त्यांनी खूप पुढे जावे यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!”, असे म्हणून डाॅ. अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

वेगवेगळ्या संकटमुळे नेहमीच हताश होणाऱ्या बळीराजाला आणि शेतमजूरांना या अनोख्या शोधामुळे दिलासा मिळणार असून आणखी काम करण्यासाठी यातून त्यांना उभारी मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा…

‘लायकीपेक्षा जास्त बोलू नका’, निलेश राणे यांचा केसरकरांना सल्ला

मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव अरुण बेळगुद्री यांचे निधन

‘मुसळधार’मुळे आज शाळेला सुट्टी

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी